ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
15-05-2024
अजून किती बळी घेतल्यानंतर गडचिरोली वनविभागाला येणार जाग
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १८
गडचिरोली: जिल्ह्यातील ज़ंगलात स्वापदानांमुळे आजपर्यंत बरेचसे बळी गेले असुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली नसल्याचे चित्र दिसत आहे कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी येथील तेंदू पत्ता मजूर नतीराम तुळशीराम नरेटी हा इसम आज दिनांक १५ सकाळी 8.30 वाजता जंगलामध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेला आणि तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानक जंगली डुकराने त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात वरील इसम गंभीर जखमी झाला असून त्याला
उचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, दिनांक १३ मे रोजी झालेल्या आंबेशिवणी येथील पार्वता बालाजी पाल वय वर्षे ६४ यापूर्वी चार दिवसाअगोदर वाघाने हल्ला करून जागीच पडशा पाडला ,अहेरी तालुक्यात अशीच एका महिलेवर जंगलात तेंदुपत्ता संकलन करीत असताना रानटी डूक्कराने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि ती महिला आजही रुग्णालयात उपचार घेत आहे पुन्हा काल दिनांक १४ मे रोजी गडचिरोली तालुक्यातील सावरगाव येथे एका महिलेला तेंदू संकलन करीत असताना झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्या महिलेवर हल्ला करून नरडीच्या घोट घेतला तद्वतच कुरखेडा तालुक्यातील घाटी (गांगोली) येथे तेंदूपत्त्याचा शिजन सुरू झाल्याने घाटी येथील तिनशे ते साडेतीनशे मजूर एकत्रितपणे गाव शेजारी असलेल्या जंगलात पहाटे तेंदूपत्ता संकलनासाठी गेले सदर मजूर तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानकपणे जंगली हत्तीने आक्रोश करीत त्या मजूरावर हमला केला तेव्हा सदर मजूर भितीच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळून गेले मात्र इश्वर नामक मजूर एका झाडावर चढला तरीही रानटी हत्तीचा हैदोस कमी झाला नाही त्या हतींचा एवढा आक्रोश होता की मजूर चढलेल्या झाडाला खाली कोसळवले त्या झाडावर चढून बसलेला मजूर झाडासह खाली कोसळवला परंतु त्याचे नशीब बलवंत्तर म्हणून झाडासोबत खाली पडल्यानंतरही आपला जीव वाचवण्यासाठी उठून त्याने पळ काढला त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला लगेचच वनविभागाला देण्यात आली तेंव्हा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावात आले असता गावकऱ्यांनी घेराव घालून जर आमच्या जंगलात रानटी हत्ती आले होते तर आम्हाला गावामध्ये मुनारी का देण्यात आली नाही सर्वश्री जवाबदारी वनविभागाची आहे असा हेका गावकऱ्यांनी धरला होता गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता सिझन सूरू झाल्यापासून जंगली स्वापदाचे हमले हे मनुष्य प्राण्यावर होत असून नाहक गोरगरीबांचे बळी जात आहेत तेव्हा तेंदूपत्ता संकलन हा सिजन गोरगरीब मजूरांसाठी पोटपाण्याची भाकर आहे अशा परिस्थितीत त्यांची भाकर हिरावल्या जात असेल तर वनविभागाचे काम काय ? आणि गडचिरोली जिल्ह्यात एकमेव अभयारण्य सोडता जिल्ह्यात एवढे मोठे स्वापद आले कुठून आणि वनविभागाने ते आणले असतील तर का माहिती दिली नाही असा प्रश्न जनता करित आहे अजून वनविभाग गडचिरोली जिल्ह्यातील स्वापदामार्फत किती बळी घेतल्यानंतर लक्ष देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments