अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
29-04-2024
दमनमरका गावातील घरे केली रानटी हत्तीने उध्वस्त
मध्यरात्रीच त्या गावातील नागरिकांना सोडावे लागले गाव
प्रा.अजय बारसागडे , आलापल्ली प्रतिनिधी
आलापल्ली:-
दमनमरका गावातील घरे रानटी हत्तीने उध्वस्त केले हि घटना २७ एप्रिल ला मध्यरात्री चे सुमारास घडली व त्याचवेळी त्या ग्रामस्थांनी आपले गाव सोडून दुसऱ्या गावात आश्रय घेतला
काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तीचा कळप पुन्हा दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात परतला असून भामरागड तालुक्यातील दमनमरका गावात रविवारी मध्यरात्री हत्तीने धुमाकूळ घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे या गावातील गावकऱ्यांना आपले गाव सोडून जाण्यास भाग पडले आहे .
या गावात तीन घरांची वस्ती असून येथील मजूर व शेतकरी अत्यंत काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. दहशत माजविणाऱ्या हत्तीने अचानक शनिवारी रात्री गावात प्रवेश करून तीन घरावर हल्ला चढवला त्यामुळे त्यांच्या घराचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी हत्तीच्या दहशतीमुळे स्वतःच्या कुटुंबीयांचे जीव वाचवण्यासाठी आपले घरदार सोडले सदर तिनही घरातील कुटुंबीयांनी बाजूच्या फोडेवाला गावात आश्रय घेतला आहे.
सदर रानटी हत्तिंचा शासनाने तातडीने बंदोबस्त करावा जेणेकरून नाहक बळी जानार नाहीत शेतकरी व गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत
तेव्हा वनविभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या बाबतीत उदासीन न राहता लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments