संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
15-07-2024
नवरगाव जंगलात निलगाईची शिकार,10 आरोपींना अटक,दोन आरोपी फरार
अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक
गडचिरोली : जंगलात निलगाईची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना ताब्यात घेतले आहे तर दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना दि .१३ जूलैला नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगाईचे शिर, पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे
खुदकम रघुनाथ गेडाम वय 25 रा. कुऱ्हाडी, अक्षय प्रभाकर सेलोटे वय 22 रा. नवरगाव, रोशन दामोधर भोयर वय 22 रा. नवरगाव, निखिल गिरिधर ठाकरे वय 30 रा. चुरचुरा, सौरभ सुरेश आवारी वय 20 रा. नवरगाव, विक्रांत प्रकाश बोरकुटे 23 वर्ष, रा. गोगाव, संकल्प संजय उंदीरवाडे वय 24 रा. नवरगाव, संदीप कानिफ चुधरी रा. नवरगाव, आकाश प्रभाकर सेलोटे रा. नवरगाव, जगदीश देवराव थोराक रा. नवरगाव यांना अटक करण्यात आली आहे.
समीर रवींद्र मडावी (रा. कुऱ्हाडी) व ओमराज विजय राजगडे (रा. चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.
त्यांना रविवारला गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी चुरचुरा चे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम, मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ, पोर्ला चे वनरक्षक विकास शिवणकर, दिभना चे वनरक्षक, गणेश काबेवार, किटाळीचे, वनरक्षक संदीप लामकासे, वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले, वनमजूर विजय म्हशाखेत्री, गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम, सोनू खोब्रागडे, रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments