STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
17-08-2024
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस भरतीमध्ये स्थान मिळविलेल्या युवक- युवतींचा अनखोडा वासियांनी केला सत्कार
अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी -
गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलिस शिपाई भरतीत आष्टी - अनखोडा परिसरातील निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट गुरुवारला अनखोडा वासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक विशाल काळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वसंत चौधरी,पोलीस पाटील अशोक चहारे,अरुण चहारे, मोरेश्वर चरडे, महेश चहारे,शरद कोहपरे,रोहीत कोडापे,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खाकीची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या सोळा युवक - युवतींचा गुण गौरव शाल व पुस्तके देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात आष्टी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व शांत संयमी व मृदू स्वभावाचे अधिकारी म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या ठाणेदार विशाल काळे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून मत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी संयम ठेवून अपयशानी खचून न जाता जिद्दीने मेहनत घेतली तर यश संपादन करणे कठीण नाही. ग्रामीण भागातील युवकांनी मेहनतीच्या जोरावर अनेक यशोशिखर गाठले असून त्यांची प्रेरणा घेवून सेवेत रुजू झालेल्यानी आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडावे असे सांगितले. यावेळी पोलीस भरतीत निवड झालेल्या वयाती आत्राम चंदनखेडी, दुषाली अलगमकर उमरी, रीना घ्यार कढोली, नागेश वाट, समीर निमरड, अमरदिप निमसरकार, सचिन निमरड, पंकज डोंगरे, सोहन तिमाडे, चेतन बट्टे, अनखोडा, धर्मा शेडमाके, विद्याताई देठे, रभूश लांबाडे, गायत्री झाडे, आचल ताकलपल्लीवार, तन्वी गंधारे या यशवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अनखोडा येथील बहुसंख्य नागरिक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मारोती चहारे तर आभार राजेश घ्यार यांनी मानले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments