अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
11-02-2024
येनापूर येथे बस थांब्यावर शेडअभावी प्रवासी त्रस्त
निवारा शेड उभारण्यासाठी लोकप्रतिनिधीं लक्ष देणार काय?
आष्टी - :
येणापूर येथे बस थांब्यावर शेड अभावी प्रवासी त्रस्त झाले असून महामार्गाचे काम होऊनही प्रवासी निवारा बांधण्यात आलेला नाही त्यामुळे प्रवाशांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात गडचिरोली ते आष्टी महामार्गावरील येनापूर हे गाव महत्वाचा मानला जातो. चामोर्शी तालुक्यातील मध्यभागी असलेल्या येनापूर येथे लक्ष्मणपूर, वायगाव आष्टी, चामोर्शी जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना येथूनच जावे लागते. पंरतु महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत येनापूर येथे वाहनांची वाट बघणार्या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वारा ,पाऊस, उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. वास्तविक पाहता महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ते शेड उभारून द्यायला पाहिजे होते परंतू असे झालेले नाही त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात तसेच सद्यपरिस्थितीत भंयकर अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशी वर्गाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या उन्हामध्ये वाहनांची वाट बघत राहणार्या अनेक प्रवाशांमध्ये चक्कर येऊन पडण्याची संख्या देखिल वाढलेली आहे. त्यामुळे येनापूर येथे प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत. त्यामुळे येनापूर येथील बसथांब्यावर प्रवासी निवारा बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे म्हणून परिसरातील जनतेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments