संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
11-02-2024
नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे विजयी
गडचिरोली :-
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे सहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून गडचिरोली येथील नवोदित कवी पुरुषोत्तम लेनगुरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "रमाई' या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुरुषोत्तम लेनगुरे हे झाडीपट्टीतील नवोदित कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रानगर्भ फुलत आहे ' मध्ये त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सहाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संगीता रामटेके, पुरुषोत्तम लेनगुरे, कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे, सुनील मंगर, प्रतिभा सुर्याराव, मनिषा हिडको, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के, वंदना मडावी, सुजाता अवचट , प्रब्रम्हानंद मडावी, उपेंद्र रोहनकर, प्रेमिला अलोने, ज्योत्स्ना बन्सोड , बाबाजी हुले, प्रभाकर दुर्गे, दिनेश देशमुख, मधुकर दुफारे, अनुराग मुळे, प्रशांत गणवीर, राजरत्न पेटकर , मुर्लीधर खोटेले , खुशाल म्हशाखेत्री, प्रमोद बोरसरे ,मिलिंद खोब्रागडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments