CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
09-12-2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान अणुबॉम्बपेक्षाही स्फ़ोटक ---प्रा. डी. के. साखरे
पंढरपूर :-भारतीय राज्यघटनेचे निर्माते, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान अणुबॉम्बपेक्षाही स्फ़ोटक असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. के. साखरे यांनी केले.
शुक्रवार दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूर येथे आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना साखरे म्हणाले की
,संपूर्ण जगाचा सत्यानाश करण्याची ताकद अणुबॉम्बमध्ये आहे तर नवीन जग निर्माण करण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानात आहे.बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. जगामध्ये फक्त विज्ञान सत्य असून विज्ञानशिवाय जे कांही आहे ते सारे अज्ञान आहे.मनुष्यमात्राला पुनःर्जन्म नाही परंतु या देशाचे संविधान बदलण्यासाठी किंवा लिहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच पुनःर्जन्म घ्यावा लागेल हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.
बाबासाहेबांमुळे आम्हाला हवे ते मिळाले -ऍड. सुहास माळवे
प्रारंभी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ऍड. सुहास माळवे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी बोलताना ऍड सुहास माळवे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समग्र मानव जातीचे नेते होते. बाबासाहेबांच्या मुळे आम्हाला हवे ते सर्व कांही मिळाले.यावेळी आर. पी. आय. चे जेष्ठ नेते अप्पासाहेब जाधव, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष पवार, मध्यवर्तीचे अध्यक्ष अमित कसबे, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे व आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या नेत्या वैशाली चंदनशिवे, मायाताई खरे, दैनिक अचूक निदानचे पंढरपूर तालुका प्रतिनिधी हणमंत आढाव, वंचितचे नेते राजाभाऊ शिंदे, पूजा चीतारे, बिरबल बाबर, गोरख कांबळे यांच्यासह मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments