रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
09-04-2024
लग्न सोहळ्यात वाढतोय वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर
ग्रामीण भागांतही लग्नात होतोय वारेमाप खर्च, सामूहिक विवाहाचा सोहळा काळाची गरज
गडचिरोली : जिल्ह्यात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असून शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही खर्चिक लग्न सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. अलीकडे लग्नसाहित्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर महागाईचे सावट आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुलांमुलीच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात. परंतु, दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील लग्नसोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते. परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटमाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे.
प्रत्येकाला वाटते, लग्न एकच वेळा होते त्यामुळे लग्नासोहळ्यात मेंहदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागतसमारंभ,भेटवस्तू, बॅन्डबाजा, डीजे, लाईटटिंग, मोठी एलएडी स्क्रीन शेवटी मांडव-वाढवणी झाल्याशिवाय पाहुणे जात नाही अशी कार्यक्रमासह खर्चाची यादी वाढली आहे. शिवाय व्हीडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा सुटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदीत वाजतगाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आत्ताच्या तरुणपिढींचा आग्रह घरच्यानसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न ग्रामीण भागात व्हायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेती व्यवसाय हा कधी अवकाळी गारपीठ पाऊस, अतिवृष्टी, महापूर, इतर रोगामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो. त्यामुळे या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न नाहीच्या बरोबर असले तरी सध्या सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात सर्वच दोन ते तीन दिवसांत लाखो रुपयांचा खर्च होत असतो. वेळप्रसंगी लग्न थाटामाटात करण्याचा हट्ट वधू किंवा वर पक्षाकडून घातला जात असल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.
सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज
समाजात गरीब श्रीमंत अशा सर्वच घटकातील मुला मुलींचे हे सामुहिक विवाह सोहळ्यात करणे काळाची गरज आहे. अलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाहाचे आयोजन करतात. या माध्यमातून सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यात बचत तर होतेच व सामाजिक संस्थांकडून लग्न जोडप्यांना घरघुती संसाराकरिता आवश्यक सामान सुद्धा दिल्या जाते. गोरगरीब शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाहामुळे मोठी मदत होते. कर्जबाजारी होण्यापासून वाचता येते. लग्नसोहळयात अमाप खर्च केला जातो. त्यामुळे आर्थिक, कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी कमी खर्चात तसेच सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments