STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
14-07-2024
कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी दिले जीवदान
१४ जनावरे मिळून ५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
आष्टी:-
कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी जीवदान दिले असल्याची घटना दि.१२ जूलै रोजी घडली आहे
गोपनीय माहितीनुसार वैनगंगा नदी पुलाजवळ नाकाबंदी करीत असताना एक पांढऱ्या रंगाची ट्रक क्रं टी एस ०८ यु जी ७७०३ ला पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये १४ नग गोवंश दाटीवाटीने, निर्दयपणे बांधून नेत असल्याचे दिसून आले
ट्रक चालक शेख इरफान मोहम्मद अली शेख वय २० रा.ता.जैनूर जि आदिलाबाद यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहन तेलंगणा येथे नेत असल्याचे सांगितले सदर वाहनात १४ गोवंश किंमत एक लाख तीन हजार रुपये व ट्रक किंमत चार लाख रुपये असा एकूण ५ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकामी अटक करण्यात आली आहे
हि कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश , उपविभागीय पोलिस अधिकारी कोकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मानकर,पोहवा मडावी ,करमे,पोशी डोंगरे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम, नागुलवार,राउत यांनी केली आहे
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments