समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
22-04-2024
देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक
महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस.
गडचिरोली; देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/04/2024 रोजी अटक करण्यात आली आहे
काल दिनांक 21/04/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळून आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम वय 34 वर्षे रा. नेलगंडा, तह. भामरागड जि. गडचिरोली असे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 22/03/2023 रोजी नेलगंडा
जंगल परिसरात 01 क्लेमोर व 02 कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सह कलम 4,5 भास्फोका, वाढीवकलम कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष
सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/04/2024 रोजी सदर गुन्हात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता
शासनाने जाहिर केलेले बक्षीस. महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments