STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
18-07-2024
उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे केले वाटप
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
आक्सापूर:- येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करुन एक नवा पायंडा पाडला आहे
आजच्या युगात लोक आपल्या वाढदिवसाला वारे माप पैसे खर्च करतात पण काही लोक पैशाचा उपयोग गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना होउन त्याचा सदुपयोग व्हावा याकरिता प्रयत्न करीत असतात
असाच आक्सापुर येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख असलेले दर्शन वासेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आक्सापुर येथील 105 विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप केले
वाढदिवसाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या दर्शन वासेकर हे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळेत नोटबुकचे वाटप करीत असतात तसेच गावातील शिवाजी चौकात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे
नोटबुक वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल तालुका काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर, ग्रामपंचायत सदस्य नितेश मेश्राम, अनिकेत बुरांडे काँग्रेस शाखाप्रमुख आक्सापुर, विकी शाहू, व बराच मित्रपरिवार उपस्थित होता
सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दर्शन वासेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यानंतर सर्व शिक्षक वृदांनी दर्शन वासेकर याच्या कार्याचा कौतुक करुन अभिनंदन केले बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments