आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
02-02-2025
लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटिल हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दि. २८ ते ३० जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, मा. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून लेझीम पथक व परेडद्वारे पाहुण्यांना पाचारण केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्म्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक श्री. कृष्णामूर्ती गादे यांनी विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होतात. दरवर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के असून मागील वर्षी दहावीतून शिवम पोलोजीवार हा विद्यार्थी आष्टी केंद्रातून प्रथम आला. तसेच गोळाफेक या स्पर्धेत इयत्ता आठवीतील तन्मय फुलझेले हा विद्यार्थी शारीरिक शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच जिल्हास्तरावर विविध खेळात विद्यालयातील विद्यार्थी प्राविण्य पटकाविले. असे बोलून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकवर्गाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रथमत: लेझीम व परेड द्वारे केलेल्या पाहुण्यांच्या स्वागताविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल आल्लूरवार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, विद्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकच्या रुपाने आवडत्या क्षेत्राची निवड त्याविषयी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा, स्टेज डेअरिंग निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे तसेच शालेय जीवनात आवश्यक मूलभूत बाबी च्या माध्यमातून व विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार, आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे केंद्र प्रमुख आष्टी, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, संस्थेच्या सहसचिव सौ. दिपा आल्लूरवार, सदस्या सौ. भवानी निलम, सौ. सरिता गादे, तसेच शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाल, सदस्या सौ. सपना पांडे, सदस्य श्री. जितेंद्र निमसरकार, म.ज्यो. फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरडे, श्री. कपिल मसराम, शारी. शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय आष्टी, कु. श्वेता कोवे राष्ट्रीय धनुर्विद्या खेडाळू, श्री. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी, श्री. प्रमथ मंडल मुख्याध्यापक शिशु मंदिर पब्लिक स्कूल आष्टी, डॉ. ओ. पी. सिंग प्राध्यापक महिला महाविद्यालय आष्टी, डॉ. पी. के. सिंग सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी, श्री. शरद कोदेट्टीवार, श्री. अनिल बोमकंटीवार, श्री. गणेश सिंगाडे पत्रकार आष्टी, तसेच पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments