ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
23-04-2024
नान्ही येथे आदिवासी कंवर समाजाचे २९ जोडपी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध
मागील २५ वर्षापासून सुरु आहे सामुहिक विवाह सोहळा आयोजनाची परंपरा
कुरखेडा:-
कुरखेडा तालूक्यातील नान्ही येथे आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समीती नान्ही यांच्या वतीने दि .२२ एप्रिल सोमवार रोजी आदिवासी कंवर समाज आदर्श विवाह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंवर समाजाचे महाराष्ट्र व छत्तीसगढ़ या दोन राज्यातील २९ वर-वधू जोडपी विवाहबद्ध झाली. खाजगी विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळता यावा, समाज व वधु पक्ष कर्ज बाजारी होऊ नये याकरीता आदिवासी कंवर समाजाचा वतीने नान्ही येथे मागील सलग २५ वर्षापासून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. आज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे उदघाटन स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी कंवर समाज राजनांदगांव (छत्तीसगढ़) चे अध्यक्ष बिंदुलाल फुलकूवंर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतभाऊ दूधनांग, कंवर समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रा. मेघराज कपूर, माजी प. स. सभापती परसराम टिकले, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन नाट, गोंदिया जि. प. सदस्य श्रीकांत घाटबांधे, आदिवासी समाज कार्यकर्ते रामदास मसराम,सूनेर सोनटापर, ब्रिजलाल बागडेरीया,चंन्द्रभान हूंडरा,देवरी पंचायत समिति सभापती अंबिका बंजार,माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, माजी प.स .सभापती गिरीधर तितराम,गणपत सोनकूसरे,पत्रकार सिराज पठान, चंपाबाई सोनकूकरा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून डॉ.मेघराज कपूर यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह करीत शासकीय स्तरावरून आदिवासी कंवर समाजाचा समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आमदार कृष्णा गजबे यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यां जाणून घेण्याकरीता समाजाची बैठक आयोजन करीत त्या मार्गी लावण्याकरीता शासन स्तरावर पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन सोनू कपूर व गणेश सोनकलंगी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक कृष्ण चन्द्रमा यानी केले कार्यक्रमात महाराष्ट्र व छत्तीसगढ़ राज्यातील कंवर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थिती होते
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments