STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
20-02-2024
विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करा अहेरी पोलीस निरीक्षक यांना महिलांचे साकडे
अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील अवघ्या दोन तीन कि. मी. अंतरावर असलेले भूंजगंरावपेठा व वांगेपल्ली येथील महिलांनी अहेरी पोलीस निरीक्षक काळबांधे यांना विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी साकडे घालून निवेदनातून अवगत करून देण्यात आले
सदर गावातील आबालवृद्ध तरूण व्यक्ती दारूच्या व्यसनात मग्न झाले आहेत दररोज दिवसात चार पाच वेळा जावून वांगेपल्ली येथील दारू पित असतात विक्रेते हे आवक वाढत असल्यामूळे लवकर दारू चे उत्पादन वाढावे म्हणून गावठी दारू मध्ये पटकी, नवसागर , अमोनिया, व अनेक झाडांचे साली चे वापर करतात त्यामूळे मूबलक दारू झपाट्याने निघत असल्यामूळे पिण्याऱ्याचे जथ्थे परत जाऊनये म्हणून असे गैरप्रकार करीत असताना दिसत आहेत. त्यामूळे कित्येक गावातील तरूणांना जीव गमवावे लागले कित्येक जन आजाराने ग्रस्त झालेले आहेत. त्यामूळे कित्येक महीलाना तारूण्यातच विधवांचे जिवन व्यथीत करावे लागत आहे . त्यामूळे गावातील महिला मंडळी एकत्रीत येवून अहेरी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवून निवेदन देवून लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विंनती करण्यात आली आहे.अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे निवेदन स्विकाराताना पोलीस निरिक्षक काळबांधे व पोलीस उपनिरीक्षक जावळे व हवालदार तोरे ,मडावी उपस्थित होते.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments