RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
29-04-2024
आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शेतमजुरास गमवावा लागला जीव
विकासाच्या नावाखाली सर्वकाही थोडांत
गोंडपिपरी:- प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी ता.गोंडपिपरी येथील डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याने एका अपघातग्रस्त शेतमजूरास जीव गमवावा लागला ही घटना काल दि.२८ एप्रिलला घडली
मृतक शेतमजुराचे नाव साईनाथ सुरकर वय ४० रा.भ़गारपेठ ता.गोडपिपरी जिल्हा चंद्रपूर असे आहे
घरी शेतीचा लहानसा तुकडा त्यात काही भागत नाही म्हणून मिळेल ते काम करायचे अनं कसाबसा आपल्या कुटुंबियांचा रहाटगाडा चालवायचा. आपल्या वाटयाला आलेल्या वेदनांचे ओझे निमुटपणे पेलायचे. पण काल त्याचा काळ ठरला. काहीही चुक नसतांना एका दुचाकीस्वाराने मागून धडक दिली व तो रोडवर कोसळला त्याला खुप भयंकर दुखापत झाली तेव्हा घटनास्थळी जमलेल्या लोकांनी शंभर मिटरवर असलेल्या तळोधी आरोग्य उपकेंद्रात भरती केले पण तिथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. उपचाराअभावी कन्हत असलेल्या साईनाथ ला अखेर गोडपिपरी कडे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली
शासनाने मोठमोठया इमारती बांधून विकासाचे चित्र रंगविणा-या या व्यवस्थेचा तो बळी ठरला. साईनाथ सुरकर वय 40 गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील रहिवाशी. पत्नी वैशाली व अथर्व अनं अनमोल असा त्याचा लहानसा संसार आपल्या वाटयाला आलेल्या शेतीचा लहानसा तुकडयात काही भागत नाही म्हणून शेतमजूरी करण्याव्यतिरीक्त त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. आपल्या वाटयाला येत असलेल्या हालअपेष्टा आपल्या मुलांच्या पदरी येउ नयेत म्हणून रात्रदिवस एक करणा-या साईनाथसाठी कालची सायंकाळ मात्र काळच ठरली. दिवसभर रोजीरोटी करून बाजार करण्यासाठी आपल्या मार्गाने पायदळ निघालेल्या साईनाथला मागून येणा-या दुचाकिने धडक दिली. अनं होत्याच नव्हत झालं.
दरम्यान यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निकीलेश नाकतोडे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेउन प्रतिक्रीया देउ असे ते म्हणाले.एकीकडे विकासाच्या बाता झाडल्या जात आहेत. मोठमोठया इमारती तयार केल्या जात आहेत. पण त्यात विकासाचा मात्र पत्ताच नाही. भंगाराम तळोधी येथे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी करोडो रूपये खर्चुन प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी इमारत तयार करण्यात आली. उपचारासाठी येथे दोन डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली. पण डॉक्टरच उपलब्ध राहत नाही. परिणामी साईनाथसारख्या निष्पापांना आपला जिव गमवावा लागत आहे. उदासिन लोकप्रतिनीधी, असंवेदनशिलतेच कळस गाठणारी प्रशासकिय व्यवस्था असली कि असे गरीबांचे नाहक बळी घेतले जाणार अशी संतप्त प्रतिक्रीया आता सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
यांना कोणी देणार का मदतीचा हात
साईनाथ सुरकर या शेतमजूराचा गेलेला बळी प्रशासकिय व्यवस्थेची पुरती पोल खोलणारा ठरला आहे. त्याच्या पश्चात अथर्व व अनमोल या दोन चिमुकल्याचं आता कस होणार हाच विचार करित पत्नी वैशाली आसवांच्या गर्गेत बुडालेली आहे. त्यांना प्रशासन मदत करून आपल्या अनास्थेची भरपाई करणाार का हा खरा प्रश्न आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments