नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
24-01-2025
विहरीत उडी घेऊन अल्पवयीन मुलाने आपली संपविली जीवनयात्रा आत्महत्या
प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गड़चिरोली
शेगाव बू(दि.24 जानेवारी) :- येथून जवळच असलेल्या व भद्रावती तालुक्यातील सांसद ग्राम चंदणखेडा गावात आज अल्पवयीन मुलगा आरोहन माणिक बागेसर याने गावातीलच बाजारवाडी मधील हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक विहारीत उडी मारून जीवन यात्रा संपवली.
सविस्तर माहिती अशी की, आरोहन हा घरातून बुधवार दि. २२ ला सायंकाळी ६ च्या सुमारास घरून निघून गेला. घरून निघून गेल्या कारणांनी मोठा भाऊ व आई यांनी सर्वत्र त्याची शोधाशोध केली. पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.
दरम्यान २ दिवसा नंतर आज दि. २४ डिसेंबर ला गावातीलच विहरीत त्याचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील काही मुलांना दिसून आले. ही बातमी गावात पसरताच गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी केली होती. त्या नंतर भद्रावती पोलीस यांना याची सूचना मिळाल्या बरोबर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या नंतर पंचनामा करून मृत्यूदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथे पाठविण्यात आला आहे.
३ वर्षा आधी आरोहन च्या वडिलांनी सुद्धा कर्ज बाजारी पणामुळे अशीच विहरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली होती. तेव्हा पासून एकट्या आई च्या भरोशावर सम्पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती. आई मोलमजुरी करून यांचे पालनपोषण करीत होती. आरोहन च्या अशा एकाकी घेतलेल्या टोकाच्या पावलांमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments