रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
03-04-2024
श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन
आष्टी:-
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आष्टी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांचा सहभाग व मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत मतदान करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे, मतदान जनजागृती च्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही अधिक मजबूत करावी असे आव्हान डॉ. रमेश सोनटक्के यांनी केले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती घोषणा फलक देऊन विद्यार्थ्यांनी ' आपल्या अमूल्य मताचे दान, आहे लोकशाहीची शान', 'मतदान करा, देश वाचवा' अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मतदारांना जागृती करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्रांगणातून घोषणा देत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, ही रॅली आष्टी या गावातून फिरून रॅलीच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मतदान करून व मतदारांमध्ये जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments