ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
20-09-2024
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या; खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दैनिय अवस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असल्याने, आरमोरी -गडचिरोली, आष्टी -आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याचे व रस्त्याचे काम पूर्ण होत पर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने भुजवून तात्पुरते दुरुस्त करण्याच्या सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी राष्ट्रीय महामार्ग च्या अधिकाऱ्यांना दिल्या. शासकीय विश्राम भवन, गडचिरोली येथे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची राष्ट्रीय महामार्ग (वेस्ट झोन ) मुख्य अभियंता मनोज कुमार, मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग संतोष शेलार, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर न. व. बोरकर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली एन. एस. बोबडे यांच्या सॊबत बैठक पार पडली यावेळी सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या ब्रिज ची उंची वाढविण्याचे व नवीन ब्रिज तयार करत असतांना शक्यतो जुना ब्रिज कायम ठेवून बाजूला नवीन ब्रिज उभारण्याच्या देखील सूचना खासदार डॉ.किरसान यांनी केल्या जेणे करून काम पूर्ण होत पर्यंत प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही, याव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गाच्या कामास पर्यावरणीय किंवा वनविभागाच्या परवानगी संदर्भात किंवा इतर कुठल्याही अडचणी येत असल्यास त्या दूर करण्याकरिता क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हुणुन पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी बैठीत सांगितले.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments