STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
11-02-2025
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एक जवान शहीद
गडचिरोली:-
भामरागड तालुक्यात पोलिस नक्षल चकमक उडाली असुन यात एक पोलिस जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.
भामरागड तालुक्यातील जंगल परिसरातील दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे, काल दिनांक 10/02/2025 रोजी अपर पोलिस अधीक्षक प्रशासन आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वाखाली १८ सी ६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटी चे 2 पथक रवाना करण्यात आले होते.
सदर ठिकाणी आज सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली असता दिवसभरात नक्षलवादी आणि पोलीस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून नक्षल साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत.
सदर कारवाईदरम्यान सी ६० पथकाच्या एका जवानाला गोळी लागून दुखापत झाली असून सदर जवानास तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाला सदर अंमलदार महेश नागुलवार रा.अधखोडा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे त्यांचे नाव असून उघा दि.१२/०२ २५ ला शासकीय इतमामात अनखोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे महेश यांचे पच्शात आई, पत्नी व दोन मुली आहेत त्यांना विरमरण आल्याची माहिती मिळताच अनखोडा गाव शोकमग्न झाले आहे व त्यांच्या परिवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments