बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
27-02-2025
बुध्दगया येथील महाबोधी बुध्दविहारासाठी गडचिरोलीत 1 मार्चला धरणे आंदोलन
गडचिरोली दि.27: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या पूज्य बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून दिनांक 1 मार्च ला धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध धार्मिक स्थळे त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली असून बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेली 50 पेक्षाही अधिक वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि पूज्य बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे. तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही. ही अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी बाब आहे.
सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी भारतातील पूज्य बौद्ध भिक्षुनी गेली 12 फेब्रुवारी 2025 पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे दिनांक 1 मार्च 2025 ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली यांचे नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
सदर धरणे आंदोलनात भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आणि बौद्ध धम्मावर श्रद्धा असणाऱ्या सर्वांनी न चुकता दुपारी 11.30 वा. उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली, संविधान फाउंडेशन जिल्हा गडचिरोली, सम्यक समाज समिती गोकुळ नगर गडचिरोली, पंचशील बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली, प्रबुद्ध बुद्ध विहार विवेकानंद नगर गडचिरोली, प्रबुद्ध विचार मंच गडचिरोली, विशाखा महिला मंडळ गोकुळ नगर, बौद्ध समाज मंडळ नवेगाव, कॉम्प्लेक्स, इंदिरानगर, साईनगर, स्नेहनगर, फुले वार्ड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , गणेश कॉलनी, फुले वार्ड, विसापूर कॉम्प्लेक्स, कोटगल, त्रिशरण महिला मंडळ रामनगर, संबोधी बुद्ध विहार समिती गडचिरोली आदींच्या वतीने करण्यात येत आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments