आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
16-12-2024
रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला लागली आग, मोठी दुर्घटना टळली.
प्रमोद झरकर उपसंपादक गड़चिरोली
वर्धा:- येथील मुख्य रेल्वे स्थानक संकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पॅसेंजर शेडला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवार 11 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. आगीत प्रवासी शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवासी शेड बांधण्यात आले आहे. वर्धा- यवतमाळ रस्त्यावरील रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. येथील तिकीट घर हे प्रवासी शेडला लागून आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास या शेडला अचानक आग लागली. त्यावेळी आवारात अनेक प्रवाशांची ये-जा सुरू होती. आग लागताच सर्वत्र पळापळ सुरू झाली. आग विझवण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. वर्धा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास वर्धा रेल्वे पोलिस करत आहेत.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments