संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
17-07-2024
वैद्यकीय अधिकारीच झाले पॉझिटिव्ह तरीही हाताला सलाईन लावून करीत आहेत रुग्णसेवा
गडचिरोली: वैद्यकीय अधिकारी मलेरिया पॉझीटीव्ह झाल्याने हाताला सलाईन लावून रुग्णसेवा करीत आहेत
भामरागड तालुक्यातील लाहेरी हे राज्याच्या शेवटचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाहेरी पलीकडे जंगल परिसरात अनेक खेड्यापाड्यांचा समावेश आहे. नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्र असून १० हजार ३४६ एवढी लोकसंख्या असलेल्या ४२ अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गावांचा या आरोग्य केंद्रात समावेश आहे. सध्या या परिसरात मलेरियाने डोकं वर काढले असून जुलै महिन्यात एका लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल अडीचशेच्या वर मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णांवर उपचार करता करता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे हे स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. या भागात दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांसोबत इतर रुग्ण वाढत असल्याने त्यांना हाताला सलाईन लावून रुग्णांवर उपचार करावा लागत आहे. लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी (गट अ) म्हणून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील डॉ. संभाजी भोकरे हे नोव्हेंबर २०१८ पासून अत्यंत खडतर परिस्थितीत सेवा देत आहेत. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका आदी स्टाफ देखील कार्यरत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाहेरी परिसरातील ४२ गावांतील आणि लगतच्या छत्तीसगड राज्यातील विविध आजाराचे रुग्ण आणि महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. दोन दिवसांपासून प्रकृती बरं वाटत नसल्याने डॉ संभाजी भोकरे यांनी स्वतःचे रक्त नमुने तपासून बघितले. RDK आणि BS दोन्ही मध्ये ते Positive आढळले. सध्या दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यासोबत इतर रुग्णांवर उपचार करणे आणि ओपीडी सांभाळणे एका गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना शक्य नसल्याने त्यांना हाताला सलाईन लावून उपचार घेत बाह्यरुग्ण विभाग सांभाळावे लागत आहे. एकीकडे अचानक काही अनुचित प्रकार घडल्यास आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यावर खापर फोडले जाते. मात्र, स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाल्यावरही रजेवर न जाता स्वतःच्या हाताला सलाईन लावून उपचार घेत ओपीडी सांभाळणाऱ्या डॉ. संभाजी भोकरे यांचा करावा तेवढा कौतुक कमीच.
अश्याप्रकारे सुरू आहे उपाययोजना व रुग्णांवर उपचार
सध्या मलेरिया नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून "टार्गेट मलेरिया" विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हिवताप प्रवण क्षेत्रात कीटकनाशक फवारणी करणे, मच्छरदाणी वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे, आरोग्य विषयी जनजागृती करणे आणि गावात जाऊन रक्ताचे नमुने घेऊन दूषित आढळल्यास तात्काळ आरोग्य सेवक आणि आशा ताई रुग्णांना फर्स्ट डोस देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवतात. ओरल ट्रीटमेंट मध्ये जर ताप कमी होत नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करतात. मात्र, ० ते १५ वयोगटाच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत असल्याची माहिती डॉ संभाजी भोकरे यांनी दिली.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments