बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
10-01-2025
पाणिपुरीच्या हातठेल्याला अर्टीकाची जब्बर धडक एक ठार तर ६ जन गंभीर जखमी
यवतमाळ :- पांढरकवड्या वरुन शिबला रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या अर्टिका गाडीने समोरुन येणाऱ्या पाणीपुरी च्या हातठेल्या ला जोरदार धडक दिल्याने हातठेला चालक जागेवरच ठार झाला. हि भंयकर घटना चालबर्डी गावाजवळील लहान पुलाजवळ दिनांक ०८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता च्या दरम्यान घडली आहे. मृतक रामजनक बाबूराम बघेल वय ४१ रा. रामनगर पांढरकवडा असे अपघातात ठार झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. रामजनक बघेल हा हात ठेल्यावर गावोगावी जावून पाणीपुरी विक्री चा व्यवसाय करीत होता व आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह चालवित होता. अपघाताच्या दिवशी रामजनक हा चालबर्डी या गावी दुपारी ०२ वाजता पाणीपुरी विकण्याकरीता गेला होता.
पाणीपुरीचा व्यवसाय करुन रात्री ८.४५ वाजता दरम्यान चालबर्डी येथून आपल्या घराकडे परत येत असताना चालबर्डी जवळील लहान पुलाजवळ समोरून येणाऱ्या अर्टीका वाहन क्रं. एम एच ३४ बीबी ०९९८ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजी पणाने चालवून समोरुन येणाऱ्या हातठेल्याला जोरदार धडक दिली या मध्ये हात ठेला चालक रामजनक याच्या जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून खुप रक्त वाहले त्याचा डावा पाय शरीरापासून वेगळा झाला होता.
त्यामुळे रामजनकचा जागेवरच मृत्यू झाला. तर अर्टिका मधील सहा जण जखमी झाले व अर्टीका गाडी दुरपर्यंत घासत जावून रोडच्या बाजूला असलेल्या शेतात जावून पडली. गाडीतील जखमी रघुनाथ कोवे वय ५३ वर्ष, सुरेंद्र नैताम वय ३९ वर्ष, युवराज पेंदोर वय ३० वर्ष, अंकूश कोवे वय ४ वर्ष जयप्रकाश पेंदोर वय ९ वर्ष सर्व रा. महाडोंळी व अर्टिका वाहन चालक नागेश्वर वसंता कोवे २७ रा.साखरा ता. घांटजी आहे. पांढरकवडा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटना स्थळी पोलीस निरीक्षक दिनेश झाबरे , पोलीस आशिष गजभिये, लक्ष्मी मलकुलवार , सचिन काकडे, सुनिल कुंटावार, जुनुनकर साहेब, राजु बेलयवार, यांनी पंचनामा करून जखमीना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी असलेल्या ६ पेशंटला वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ ला लगेच रेफर करण्यात आले या अपघाताची तक्रार विवेक माधवसिंग बघेल ३६ रा. रामनगर यांनी पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीसांनी अर्टिका चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लक्ष्मी मलकुलवार करीत आहेत.
Your car is our responsibility
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments