समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
31-07-2024
अतिदुर्गम भागातील मंडळ अधिकारी, तलाठ्यांची मुख्यालायाला दांडी, दाखल्यांसाठी शेतकरी , विद्यार्थी हतबल
एटापल्लीः अतिदुर्गम भागातील तलाठी व मंडळ अधिकारी हे मुख्यालयी उपस्थित न राहिल्याने आणि आपल्या कर्तव्याप्रती उदासीन असल्याचे चित्र आदिवासी भागात दिसून येते आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता, शेतकरी विद्यार्थी, मेटाकुटीला आले आहेत
हा प्रकार सध्या जारावंडी साजाचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास कुलूप लावलेले असते. त्यामुळे सदर साजातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
गेल्या आठवड्या पासून संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते नदी नल्यांना पुर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसले त्यामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाले आहेत
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर पाहणी करिता वरिष्ठ अधिकारी ऑनफिल्ड जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत परंतु एटापल्ली तालुक्यातील जारावंडी साजातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सदर साजातील पुरपीडित शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहेत
मुलाच्या शैक्षणिक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची व पीक कर्जासाठी सातबारा व खातेउताऱ्यांची आवश्यकता असताना अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत
सदर बाबीकडे संबंधित वरीष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष केंद्रित करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments