संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
24-01-2025
स्मार्ट मीटरच्या नावावर वीज ग्राहकांना सरकारकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न - आ. विजय वडेट्टीवार
मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील आश्वासनावरून घुमजाव
स्मार्ट मीटर न लावण्याचे जिल्हा वासियांना काँग्रेसचे आवाहन
गडचिरोली:-
निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारने व्यवसायदारांचे हित जोपासण्यासाठी राज्यातील वीज वापर करणाऱ्या जनतेच्या मानगुटीवर आर्थिक भुर्दंड लादणारे व दीड पट अधिक गतीने चालणारे स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने लावणे सुरू केले असून जनतेने सरकारच्या या अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. असा सज्जड इशारा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने केवळ सत्ता प्राप्तीसाठी प्रलोभने देऊन जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजवर केले आहे. देशासह राज्यात महागाई, बेरोजगारी यामुळें सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच विवीध जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्व सामान्यांना जिवन जगणे अवघड झाले आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी विज वितरण कंपनी कडून विज ग्राहकांचे विद्युत मीटर बदलाविण्यात आले होते. मात्र वर्ष लोटताच आता सरकारने स्मार्ट मीटर च्या नावाखाली वेठीस धरण्याचा सपाटा सुरू केला आहे. या संदर्भात विरोधी बाकावरून स्मार्ट मीटर ला कडाडून विरोध करीत आम्ही जनहिता करिता आवाज उचलला असताना मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यावरून आता तुछच्या केले असून जनतेला दिलेले स्मार्ट फिटर न लावण्याचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. तर स्मार्ट मीटर हे दीड पट अधिक गतीने चालणारे मीटर असुन हे प्रीपेड असल्याने यात अगोदर रिचार्ज कारणे अनिवार्य आहे. आहे मोबाईल प्रमाणेच रिचार्ज संपला की विज पुरवठा आपोआप बंद होईल. म्हणजेच जनतेला रात्रौ बेरात्री लहान मूल,अभ्यासक मुले तसेच इतर सर्व कार्यासाठी चक्क अंधारात रात्र काढावी लागणार आहे.
देशांतील व राज्यातील महायुती सरकार हे गोरगरिबांसाठी नसून केवळ व्यापारी हीत जोपासणारे सरकार असुन स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) योजने अंतर्गत जनतेची अर्थिक लूट करु पहाणाऱ्या या लुटारू सरकारच्या अन्यायकारक धोरणाला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रखरपणे विरोध करणे गरजेचे असुन जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर आहे. आपण सर्व विज ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवावा. तसेच विज वितरण कंपनी कडून कुठल्याही ग्राहकाकडे बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न होत असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल काँग्रेस नेते, राज्याचे माजी विरोधी विरोधी पक्षनेते,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments