अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
25-07-2024
आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!
अंगावर शहारे आणणारा योगायोग
चंद्रपूर:- "वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता" याच म्हणी प्रमाणे वाघ अचानक समोर उभा झाल्याने एका शेतकऱ्यास जीव मुठीत धरून त्याचेकडे पहात राहावे लागत होते
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप सुटतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोबळी वळून बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा राहिला.
सध्या सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. पाऊस असूनही शेतकरी आपल्या शेतात रोपे लावण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नावाचे शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलवरून गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलवरून गोविंदपूर या गावी परतत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर अचानक वाघ जंगलातून बाहेर येऊन रस्त्यावर आला. दोघेही समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या मागे किंवा पुढे कोणीच नव्हते. शेतकऱ्याने समोर वाघ पाहून तो अवाक होऊन आता आपले काही खरे नाही असे त्याला मनोमन वाटत होते
तेवढ्यात मंगरुड कडून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस तेथे पोहोचली. बस चालकाने तात्काळ बस थांबवून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी वेळ वाया न घालवता एसटी बसमध्ये बसवून त्याची सायकलही बसमध्ये ठेवून एसटी बस रवाना केली तेव्हा वाघ ताबडतोब जंगलाच्या दिशेने निघून गेला 'वेळ आली होती, पण काळ आला नव्हता' या म्हणीच्या धर्तीवर शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. यावेळी वाघ यांना समोर पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितल्याने वाघ व शेतकऱ्याच्या समोरासमोर उभे टाकल्याच्या घटनेची गावात खमंग जोरदार चर्चा झाली.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments