CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
13-07-2024
जिल्हा परिषद शाळेला आले दारु अड्डयाचे स्वरूप
धाबा:-
धाबा येथील जिल्हा परिषद ची शाळा दारुडे व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा सन 1888 मध्ये धाबा गावात उघडल्या गेली. एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेने अनेक अधिकारी घडविले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी या शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र येतात. शाळेच्या इमारती समोर नतमस्तक होतात. आता मात्र या शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. कधी शिक्षणाचे माहेरघर असलेली ही शाळा आता दारुड्यांच्या आणि जुवारीचा अड्डा बनली आहे. शाळा परिसरात दारूचा रिकामा बाटलांच्या अक्षरस सडा पडलेला. ठीक ठिकाणी शौच केलेलं. शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर इथं जुआरी एकत्र येतात. दारूंच्या घोटासोबतच पत्त्यांची अदलाबदली करतात. या शाळेतील शिक्षक चंद्रपूर येथून धाबा गावाला येतात.वेळेवर शिक्षक कधीच हजर होत नाही अशी पालकांची तक्रार. शिक्षक वेळेवर येत नाहीत. आलेच तर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. शाळेला लागूनच लहान नाला आहे. या नाल्यात विद्यार्थी खेळायला जातात. त्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? या शाळेत गरिबांची मुलं शिकतात. त्यामुळे पालकांनी तक्रार केली, ओरड केली तरीही शिक्षण विभाग त्याकडे लक्ष देतच नाही असा अनुभव पालकांना आलेला आहे. ज्या शाळेला दैवत मानल्या जाते त्या शाळेची ही दयनीय अवस्था बघून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments