संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
10-06-2024
दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षल्यानी केले गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण
गडचिरोली, ता. १०: अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या एका नक्षल्याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके (३७) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
किशोर कन्नाके यांनी केंद्रीय राखीव दलाच्या अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. किशोर हा २०१४ मध्ये भामरागड दलममध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून सहभागी झाला. २०१५ मध्ये दंडकारण्य किसान मजदूर संघटेचा अध्यक्ष आणि पुढे २०१८ मध्ये नक्षल्यांच्या क्रांतिकारी जनता समितीचा सदस्य म्हणून २०२२ पर्यंत तो कार्यरत होता.
३ चकमकी, ४ खून आणि जाळपोळीच्या ४ घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. २०१७ मध्ये दरबा पहाडावर, २०२१ मध्ये कोपर्शी आणि २०२२ मध्ये पेनगुंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. २०१५ मध्ये मल्लमपोडूर तलावाजवळच्या रस्त्यावर एका नागरिकाचा झालेला खून, २०१८ मध्ये गोंगवाडा टी पॉईंटजवळ झालेला एका महिलेचा खून, २०१९ मध्ये जुव्वी नाल्याजवळ झालेली एका इसमाची हत्या आणि २०२३ मध्ये पेनगुंडा-गोंडवाडा रस्त्यावर झालेल्या एका नागरिकाच्या हत्येत त्याचा सहभाग होता.
शिवाय २०२१ मध्ये मरकनार-मुरुमभुशी मार्गावर, २०२२ मध्ये बोटनफुंडी-विसामुंडी, तसेच पेनगुंडा आणि २०२३ मध्ये हिदूर गावाजवळच्या जंगलात झालेली बांधकामावरील यंत्रे आणि वाहनांच्या जाळपोळीत किशोर कन्नाकेचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. किशोरला केंद्र व राज्य शासनाकडून एकूण साडेचार लाख रुपये मिळणार आहेत.
२०२२ पासून आतापर्यंत १५, तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६६३ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.
केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक जगदीश मीणा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे कमांडंट एम.एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात आत्मसमर्पणाची प्रक्रिया पार पडली.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments