RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
18-07-2024
काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाने भुमीअभीलेख अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन
देसाईगंज-
देसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी या मागणीला घेऊन काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात शहराच्या कुरखेडा टी-पाईन्टवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांनी येत्या तीन महिण्याच्या आत सर्व्हेक्षण करून नागरीकांना सनद व आखिव पत्रीका देण्यात येणार असल्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाचे हे फलित असुन सर्व्हेक्षणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
देसाईगंज शहर सिटी सर्व्हेच्या कामासाठी देसाईगंज नगर पालिकेच्या वतीने सन २०१८ मध्ये जवळपास ८० टक्के रक्कम शासना जमा केली आहे.मात्र भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतिने सिटी सर्व्हेचे काम किमान जमा करण्यात आलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात आलेले नाही.या संदर्भात दि.९ जुलै २०२४ रोजी उपविभागीय कार्यलयास निवेदन सादर करून यथाशिघ्र आखिव पत्रिका देण्यासंदर्भात कळविले होते.मात्र देसाईगंज शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आली नसल्याने दि.१८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्टवर चक्का जाम आंदोलन करण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात देसाईगंज शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांने पुढाकार घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला आहे.
लेखी आश्वासनाचे पत्र देतेवेळी जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख गडचिरोलीच्या नंदा आंबेकर,देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रभारी उपअधीक्षक एस.एन. पवार,चौकशी अधिकारी पी. एल.कुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आंदोलनात युवा नेते पिंकु बावणे,लिलाधर भर्रे, काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, महादेव कुंमरे,भुमेश्वर शिंगाडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे,रजनी आत्राम, मालता गेडाम,विमल मेश्राम, वैष्णवी आकरे,गीता नाकाडे, पुजा ढवळे,प्रमोद दोनाडकर, नितीन घुले,भुमित मोगरे, सुनिल चिंचोळकर,अमन गुप्ता,शुभम शिवुरकर,संदीप प्रधान,मनिष मेश्राम,सरस्वती मराठे,शालुबाई कोराम,प्रेमिला लिचडे आदी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments