संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
29-03-2025
छत्तीसगढ येथून दुचाकी चोरट्यांना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद
विविध गुन्ह्रांतील एकुण 3,15,000/- रुपये किंमतीच्या 09 दुचाकी वाहनांचा पोलीसांनी लावला शोध
गडचिरोली जिल्ह्रात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोस्टे कोटगुल येथे दि 24/03/2025 रोजी कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. 02/2025 गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्राचा तपास चालु असताना सिसिटीव्ही फुटेजच्या मदतीने दि. 25/03/2025 रोजी पो. स्टे. कोटगुल येथील पोउपनि. दयानंद शिंदे यांनी आरोपी नामे प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे याची ओळख पटविली होती. त्यानंतर गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा टेमली (छ.ग.) येथून आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे, वय 19 वर्षे, रा. टेमली ता. मोहल्ला, जि. मानपूर-मोहल्ला (छ.ग.) याला मौजा टेमली येथून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने व त्याचा साथीदार नामे टेमनलाल रामखिलावन साहू, वय 19 वर्षे रा. चिलमगोटा ता. दौंडी लोहारा, जि. बालोद (छ.ग.) यांनी मिळून सदर गुन्ह्रात चोरीस गेलेली मोटारसायकल वाहन क्र. सी.जी-07-बी.व्ही.-5653, किंमत अंदाजे 30,000/- रु. चोरी केली असल्याचे आरोपीने पोलीसांसमक्ष कबूल केले होते. यानंतर दिनांक 25/03/2025 रोजी दोन्ही आरोपीतांस पोस्टे कोटगुल पोलीसांनी अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
यादरम्यान आरोपींना विश्वासात घेवून गुन्ह्राच्या संदर्भाने अधिकची विचारपूस केली असता, पोस्टे कोटगुल येथे दाखल अप. क्र. 002/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. सह 1) पोस्टे कोरची येथे दाखल अप.क्र. 0029/2025 कलम 303(2) भा.न्या.सं., 2) छत्तीसगडमधील पोस्टे बसंतपूर येथे दाखल अप.क्र. 0097/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. असे गुन्हे उघडकीस येऊन या गुन्हयांतील एकुण 03 दुचाकींसह इतर 06 दुचाकी अशा एकुण 09 दुचाकी किंमत अंदाजे 3,15,000/- रु. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. पोस्टे कोटगुल पोलीसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे सदर गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. दयानंद शिंदे हे करीत आहेत.
सदर तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वात पोउपनि. दयानंद शिंदे व पोहवा/भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, पोअं/विनय सिध्दगु, किशोर बावणे, अनिल मडावी यांनी पार पाडली.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments