संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
02-04-2024
पाणी द्या हो पाणी द्याहो, गडचिरोलीतील लक्ष्मी नगर महिलांचा टाहो!
तिन महिन्यांपूर्वी पासून पाणीपुरवठा योजना बंद आहे
गडचिरोली:-
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा नळ योजना तीन महिन्यापासून ठप्प पडली असून आरमोरी रोड,लक्ष्मी नगर मध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने लक्ष्मी नगर च्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . तीन महिन्यापासून लक्ष्मी नगर शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही नगर प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते आहे
असे असूनही मात्र पाणी कर सुरुच आहे तिन महिन्यात पाणीपुरवठा करण्यात आला नाही तर पाणीकर का द्यावे असे प्रश्न लक्ष्मी नगरवासीयांना पडले आहे
गडचिरोली शहरातील प्रशासन सुज्ञ असूनही या बाबतीत उदासीन का आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहे
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मी नगर शहरवासीयांना इतरत्र धाव घ्यावी लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ लक्ष्मीनगर शहरवासीयांवर आलेली आहे.
गडचिरोली शहराला ईतर वार्डात नियमित पाणीपुरवठा होतो आहे मात्र लक्ष्मी नगर मध्ये का होईना ?
तिन महिन्यापासून पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.
कठाणी नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीपुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून नगर परिषद प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहीरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे मात्र या बाबी कडे नगर परिषदेच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशीच स्थिती दिसून येते आहे
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लक्ष्मी नगर येथील ग्रामस्थांना इतरत्र भटकावे लागत आहे
गडचिरोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही लक्ष देईना झाले आहेत
आता प्रश्न असा पडतो आहे की, ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी पुरवठा बंद झाल्याने लक्ष्मी नगर वासीयांची ससेहोळपड होते आहे तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन याबाबत उदासीन आहे असेच दिसते आहे
तात्काळ पाणी समस्या दुर करावी अशी मागणी आरमोरी रोड लक्ष्मी नगर येथील महिलांसह पवन आखाडे,शंकर रनदीवे, विनोद खोब्रागडे ,नितीन तारवेकर,वैभव कहुरके,दिवाकर ठेंगरे,अवी झीलपे,पराये,दिलीप मानुसमारे,पडीशालवार,अशोक सुत्रपवार आदींसह लक्ष्मी नगर वासीयांनी केली आहे
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments