ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
18-07-2024
डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना टाळे ठोकणार - आजाद समाज पार्टीचा इशारा
गडचिरोली : दि. १५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमीत शिक्षकांची भरती होई पर्यंत अनुसूचित जमातीतील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती करण्याचे सूचना सर्व जिल्हा परिषद सीईओ ना देण्यात आल्या आहेत तसातर हा आदेश म्हणजे सरकारी शाळांचे व शिक्षकांचे भविष्यात खाजगीकरण करण्याचा डावच आहे यावर वेगळ्या स्वरुपात राज्यव्यापी आंदोलन करूच तथापि सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती करताना संदर्भीय आदेशात क्रमांक १ मध्ये "नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावी," हि सूचना आजाद समाज पार्टी कदापी मान्य करणार नाही. ज्याअर्थी जिल्ह्यात अनुसूचित जमातीतील स्थानिक बेरोजगारांची एका बाजूला प्रचंड मरमर होत असताना आणि जिल्ह्यात हजारोच्या संख्येने डी टी एड, बी एड ,एम एड पदवीधारक शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवार बेरोजगार असताना प्रशासन जर ५८ वर्षापर्यंत नौकरी करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करून बेरोजगारांशी खेड मांडत असेल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.
सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासनाच्या आदेशातील निवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर नियुक्त करण्याची क्रमांक १ ची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना टाळे ठोकून आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात ८४ सरकारी शाळा शिक्षकाविना आहेत त्या ठिकाणी सुद्धा तातडीने शिक्षक नेमणूक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी आजाद समाज पार्टीचे गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, अंकुश कोकोडे, आशिष गेडाम, सतीश दुर्गमवार, घनश्याम खोब्रागडे, महेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments