संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
21-02-2024
'मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ' चामोर्शी तालुक्यातील एका युवकाने बॅनरबाजी करुन मोदी सरकारचा केला निषेध
गडचिरोली,
केंद्राची कुठलीही योजना ही करदात्याच्या पैशाने राबविली जाते. त्यामुळे ती भारत सरकारची हमी अशी असायला हवी. मात्र असे न होता ती 'मोदी सरकारची हमी' अशा नावाने भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी असे प्रश्न बऱ्याच तरुणांना पडले आहेत त्याच अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावातील संतोष तिमाडे या युवकाने गावातील आपल्या एका छोट्याशा दुकानासमोर मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ व इव्हिएम हटाव देश बचाओ अशाप्रकारे बॅनर लावण्यात आले असल्याने आष्टी परिसरात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सदर बॅनर हे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या गावात हे बॅनर लावण्यात आले आहे भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. असे काही पोस्टर्स भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर या बॅनर्सवर भारत सरकार व्दारा राबविलेल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजना ह्या मोदी सरकारची हमी असा उल्लेख त्यावर केला केलेला आहे.या योजना कोणासाठी? याचे निकष काय? लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा? अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही.
भारत लोकशाही राष्ट्र असून देशाचा कारभार हा पंतप्रधान मार्फत चालविल्या जातो. मात्र, शासनाच्या जाहीरातीत व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख कधीच केल्याचे पाहण्यात आले नाही परंतु शासनाच्या योजना या भारत सरकारच्या योजना असतांना मोदी सरकारच्या योजना असा उल्लेख करणे उचित नाही. त्यामुळे मोदी सरकारची हमी असा उल्लेख असलेले बॅनर्स लावून भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर लावून गावोगावी मोदी सरकारची हमी अशे या बॅनर मधून दाखविले जात आहे मग मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी हे कळायला मार्ग नसल्याने मोदी सरकार होऊ नये म्हणून मी भारत सरकार वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ असे माझ्या दुकानासमोर लावले मी कोणत्या राजकीय पक्षांच्या वतीने लावले नसून संविधान वाचविण्यासाठी हे बॅनर लावले असल्याचे संतोष तिमाडे यांनी सांगितले
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments