ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
09-05-2024
दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना
गोंडपिपरी, ता. ८ : नेहमी आपल्या घराजवळ खेळणारे काही चिमुकले न्यायालयाच्या बाजूला असलेल्या तलाव परिसरात गेले. यापैकी दोघे जण पोहायला तलावात उतरले अन् बुडाले. रात्री उशिरापर्यंत मुले घरी आले नाही. यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. शेवटी तलावाच्या जवळ दोघांचे कपडे आढळून आले. पोलिसांना बुधवार (ता. ८) सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.
मंगळवारी दुपारी गोंडपिपरीत घडलेली ही घटना रात्री समोर आली. दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गोंडपिपरीकरांना हेलावून सोडले. गौरव विलास ठाकूर (वय १४), शौर्य भास्कर पिंपळशेंडे (वय १५) अशी मृतांची नावे आहेत. ते येथील शिवाजी चौकातील रहिवासी होते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास शिवाजी वार्डातील काही मुले फिरण्यासाठी गेले. त्यानंतर न्यायालयाजवळ असलेल्या परसबोडी तलावात त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात उतरले. काही वेळाने तेथील काही मुले घरी परतले. मात्र, बऱ्याच वेळेपर्यंत गौरव व शौर्य हे घरी परतले नाही. आई वडिलांनी त्यांना शोधण्यास सुरवात केली. जवळच असलेल्या तलावाजवळ ते पोचले. तिथे आपल्या मुलांचे कपडे बघून त्यांना शंका आली. लगेच आई वडिलांनी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र रात्र बरीच झाल्याने पथक पोहचू शकले नाही. दरम्यान तलावाजवळ रात्रभर पोलिसांनी पहारा दिला. सकाळी पोलिसांनी तलावातून दोन मृतदेह बाहेर काढले. आपल्या चिमुकल्या मुलाचे शव पाहता आई वडिलांनी हंबरडा फोडला.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments