आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
23-02-2024
शासनाकडून पुरवठा न होताही अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप झालेच कसे?
जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी पुरवठा निरीक्षक व गोदाम व्यवस्थापक यांना बजावले कारणे दाखवा नोटीस
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्फत शासकीय योजना अंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात येणार होते परंतू गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा न होताच अहेरी तालुक्यात साड्या वाटप केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी पुरवठा निरीक्षक आडेपवार व गोदाम व्यवस्थापक ताकवाले यांना तहसीलदार अहेरी यांच्या मार्फत २०/०२/२०२४ ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी साडीचे वाटप करण्यात यावे यासाठी यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आली असून जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील एका महिला सदस्यांना साडी चे नियतन मंजूर झालेले आहे
मात्र या जिल्ह्याकरीता साड्यांचा पुरवठा करण्यातच आलेला नाही
तरीसुद्धा अहेरी तालुक्यातील कार्डधारकांना AePDS ऑनलाईन प्रणालीवर ५६३ साड्यांचे वाटप केल्याचे दिसून येते आहे
गडचिरोली जिल्ह्यात साड्यांचा पुरवठा झलेला नसताना अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी साड्यांचे वाटप कुठून केले व साड्याचा ऑनलाईन स्टाक कसाकाय उपलब्ध करून देण्यात आला आहे आपल्या स्तरावरुन साड्यांचे वाटप झालेच कसे व साड्यांची रक्कम वसुल करण्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यास आपणाकडून ५६३ साड्यांचे पैसे वसूल का करण्यात येऊ नये या करिता नोटीस मिळाल्यानंतर २४ तासाचे आत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम १९७९ चे तरतुदीनुसार यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरुन आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई चे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल असे पत्रात नमूद केले असून अशा अधिकाऱ्यांनर खरोखर कारवाई होणार का औसुख्याचा विषय जनतेसमोर उभा ठाकला आहे
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments