ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
29-04-2024
समोरच्याला वाचविण्याच्या नादात गमवावा लागला दुचाकीस्वार महिलेला स्वतःचा जीव
मुलीसह भाचा जखमी
गडचिरोली : आपल्या मुलीला व भाचाला शाळेत सोडण्यासाठी स्कुटीने जात असलेल्या महिलेच्या समोर अचानक एक मुलगा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित होवून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर मुलगी व भाचा जखमी झाल्याची घटना शनिवारला सकाळी शहरातील धानोरा मार्गावर घडली. मेघा भरडकर, स्नेहनगर गडचिरोली असे मृतक महिलेचे तर जॉयश्री भरडकर (14) असे जखमी मुलीचे व रेहांश कोलते (5) असे भाचाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, स्नेहनगर येथील रहिवासी मेघा भरडकर यांची 14 वर्षीय मुलगी जॉयश्री व तिच्या भावाचा 5 वर्षीय मुलगा रेहांश हे धानोरा मार्गावरील कारमेल शाळेत शिक्षण घेतात. रोजच्या प्रमाणे त्या शनिवारला दोघांनाही शाळेत सोडून देण्यासाठी स्कुटीने घरून निघाल्या. दरम्यान, धानोरा मार्गावरील भंगार विक्रेत्याचा मुलगा अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मेघा भरडकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर मुलगी व भाचा जखमी झाले. गंभीर मेघाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने शहरात दररोज लहान-मोठे अपघात घडत असतात. मेघा भरडकर यांचा सुद्धा मृत्यू अतिक्रमणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. नगर परिषदेने अतिक्रमणाच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments