नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
23-03-2024
महसूल अधिकारी आले रे आले, ट्रॅक्टर घेऊन पळा या नादात तरुण गेला जिवानिशी
अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॉक्टर चालकाचे गाडीवरील सुटले नियंत्रण
ब्रह्मपुरी;-
तालुक्यातील बेलगाव देऊळगाव येथील वैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास अवैद्य रेती उपसा करीत असताना अचानक महसूल अधिकारी आले रे आले ट्रॅक्टर घेऊन पळा असे आवाज येताच ट्रॅक्टर घेऊन पळत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो खाली कोसळला व त्यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने त्याचा मृत्यू झाला
अवैध रेतीचे उत्खनन सुरू असताना पळापळीच्या नादात कुटुंबातील एकुलता एक मुलाला त्याचा जीव गमवावा लागला त्यामुळे गावावर व कुटुंबावर शोक कला पसरली आहे बेलगाव येथे घाटावरील रेती चोरीला आळा घालण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अनिल जिटावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कावळे आत्राम यांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आला
मृतक युवकाचे नाव गोलू उर्फ प्रणय गुरुदेव धोटे वय २० वर्षे रा. देऊळगाव असे आहे मागील वर्षी ब्रह्मपुरी तील काही रेती घाटाचा लिलाव झालेला होता बेलगाव देऊळगाव येथील रेती घाटाचा लिलाव झाला होता मुदतीत रेती साठ्याची विक्री न झाल्याने रेतीसाठा शिल्लक होता एका राजकीय पुढाऱ्याने रेतीसाठ्याची विक्री करण्याचे परवानगी प्राप्त केली ठेकेदाराने नदीपात्रामधून दिनांक 14 मार्च च्या रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर नी रेती उपसा करण्याचे काम सुरू केले असल्याचे घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले अशातच अधिकारी येत असल्याची चाहूल लागल्याने घाटावरील दिवाणजी यांनी सर्व ट्रॅक्टर वाल्यांना ट्रॅक्टर लपविण्याकरिता सतर्क केले ट्रॅक्टर हा देऊळगाव येथील तलमले यांच्या मालकीचा असल्याने ट्रॅक्टर वर चालक प्रणय गुरुदेव धोटे यांनी ट्रॅक्टर लपविण्याच्या नादात घाटाच्या जवळ असलेल्या शेतामध्ये जोराने वाहन नेल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ही घटना पहाटेच्या सुमारास घडली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments