ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
17-03-2025
गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक येथेच मुद्देमालासह केली अटक
चिमूर:-
अमली पदार्थ गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक परिसरात रंगेहाथ अटक केल्याची घटना चिमूर बसस्थानकावर काल दि १६ मार्च ला घडली यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. वहीद अब्दुल रहीम (वय अंदाजे ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, वहीद अब्दुल रहीम हा चिमूर बसस्थानकावर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कथ्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात १९६४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी पंच, फोटोग्राफर आणि मापारी यांच्या समक्ष गांजा जप्त केला आणि आरोपीला अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू आणि नयोमी साटम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा अतिरीक्त कार्यभार चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष बाकल, स.पो.नि. निशांत फुलेकर, स.पो.नि. मल्हारी ताळीकोटे, पो.उपनि. दत्ताहरी जाधव, सहाय्यक फौजदार विलास निमगडे, सचिन खामणकर, भरत घोळवे, सचिन साठे, कुणाल दांडेकर, सोनू एलकुचेवार यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
आरोपी वहीद अब्दुल रहीम याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर हे करत आहेत
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments