नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
24-07-2024
गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात
रानमुल - माडेमुल पोटफोडी नदीच्या पुरामुळे ६ दिवसापासून आवागमन बंद
गडचिरोली:-
गंभीर आजारी (साप चावल्याचा संशय) महीलेस आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप रुग्णालयात पोहचवून उपचारासाठी दाखल केले आहेत
गडचिरोली मुख्यालयाला पासून अवघ्या १५ कि.मी अंतरावर अतिदुर्गम भाग रानमुल ते माडेमुल असून पोटफोडी नादीला संततधार पावसामुळे पुर आल्याने गेल्या आठ दिवसापासून त्या गावांच संपर्क तुटला आहे माडेमुल वरुन रानमुल ते गडचिरोली येणे जाणे अजुनही बंदच आहे.
दि.२४ चे रात्रौ माडेमुल येथील कल्पना परसे हि गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे आणावयाचे होते. तेव्हा माडेमुल येथील गावकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक( SD RF)
यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी बोटीच्या सहाय्याने कल्पना हिला गडचिरोली रुग्णालयात पोहचविण्यात आले. मालेमुल ते गडचिरोली संर्पक अजुनही तुटला असुन आता मात्र आप्पती व्यवस्थापन व गावकरी सहकार्य करीत आहेत.
पोटफोडी नदी पुरामुळे आजुबाजुच्या शेतात पुराचे पाणी घुसले असुन शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहेत तेव्हा शासनाने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments