अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
31-01-2024
कोरंबी ग्रामस्थांनी वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण कामाचे केले उद्घाटन
नागभीड --:
सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा कोरंबी ता. नागभीड च्या वतीने सामूहिक वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण कामाचा शुभारंभ तसेच सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २९जानेवारी २०२४ रोजी दिलीप गोडे आणि डॉ किशोर मोघेयांचे हस्ते समन्न झाला आहे.
वनहक्क कायदा 2006 अंतर्गत समूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना 30 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णय नुसार रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळाली आहे. सदर शासन निर्णयान्वये ग्रामसभा कोरंबी ला वनहक्का क्षेत्रात वृक्षारोपण कामासाठी रु. ४६७८३४८रुपयांची निधीस तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली आहे. या वृक्षारोपण कामाला सुरुवात करण्याचे हेतूने वृक्षारोपण शुभारंभ कार्यकामाचे आयोजन समूहिक वनहक्क समिती कोरंबी च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी हनुमान मंदिर पासून एक पालखी तयार करून वृक्ष दिंडी,लेझीम,भजन व बँड पथकासह पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच पुष्पगुश्चाने दिलीपजी गोडे, कार्यकारी संचालक विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर , डॉ किशोरजी मोघे ,संस्थापक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ, गुणवंत वैद्य, रुपचंदजी दखने कुरखेडा यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी केशव जांभुळे , अध्यक्ष सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती कोरंबी, डॅनिअल देशमुख, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कोरंबी,यशवंत मेश्राम, सरपंच मांगरूड, रिवॉर्ड्स संस्थेचे समन्वयक भोजराज नवघडे, कैलास नन्नावरे, , ग्रुप ऑफ ग्रामसभा नागभीड चे सचिव मनोहर मगरे, कोरंबी ग्रामसभेचे सल्लागार केशव खंडाते, प्रफुल मसराम,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे कार्यकारी संचालक दिलीप गोडे आणि किशोरजी मोघे ,संस्थापक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ यांच्या हस्ते वृक्ष रोपण व कार्यालयाचे उद्घाटन करून सुभारंभ करण्यात आले. प्रमुख ग्रामस्थांना प्रमुख अतिथीची समयोचित मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत गीत जिहा परिषद शाळा कोरंबी यांनी सादर केले, संचालन शंकर नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॅनिअल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समूहिक वनहक्क समितीचे सर्व पदाधिकारी, महिला प्रतिनिधींनी तसेच सर्व कोरंबी वासियानी अथक परिश्रम घेतले.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments