संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
03-01-2025
अनखोडा ग्रामपंचायतीने लायड्स मेटल्स कंपनीला जमीन अधिग्रहणाविरोधात केला ठराव पारित
कोनसरी लोहनिर्मीती कारखाना विस्तारिकरणास शेतजमीन देण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
आष्टी -
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लोहनिर्मिती कारखान्याच्या विस्तारीकरण प्रक्रियेला वेग आला असून 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकिकृत स्टील प्रकल्प नियोजित आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने 23 जानेवारीला कोनसरी येथे जनसुनावणी आयोजीत केली आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे प्रभावित गावातील शेतकरी धास्तावले असून लोहनिर्मिती प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे सुपीक जमिनीवरील पिके नष्ट होणार असून जल, जंगल व मानवी जीवाची फार मोठी हाणी होणार असल्याने या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या विरोधात प्रभावित अनखोडा ग्रामपंचायतीने दोन जानेवारीला
ग्रामसभेत ठराव पारीत केला. तसेच वरील ग्रामपंचायत हद्दीत भूसंपादनाचा शासनाने व कंपनीने विचार केल्यास याला तीव्र विरोध करण्यात येईल असेही ठरावात नमूद केले आहे
ग्रामपंचायती च्या विशेष सभेस अनखोडा येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांमध्ये प्रकल्पाच्या विस्तारी करणावरून मोठया प्रमाणात रोष बघावयास मिळाला
परीसरातील प्रभावित गावांनी जमीन अधिग्रहणास तीव्र विरोध करीत ठराव घेण्यास सुरवात केली असुन येत्या काळात स्थानीक शेतकरी कंपनी प्रशासन व सरकार यामध्ये संघर्ष होणार अशी चिन्हे आहेत
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments