अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
10-04-2024
उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली
आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी - आलापल्ली महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments