अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
01-05-2024
आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला
मात्र कारवाई न करता पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आला
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा चालू असून बुधवारी ता. १ मे रोजी सकाळी महसूल विभागाची गस्त चालू असताना आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला आहे. सदर ट्रॅक्टरला नंबर नसून पोलिस स्टेशन आष्टी येथे ठेवण्यात आला आहे
तहसीलदार चामोर्शी यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता आमच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडला आहे व पंचनामा करून पोलिस स्टेशन आष्टी ठेवण्यात आला आज सुट्टी असल्याने कारवाई होऊ शकली नाही आणि कारवाई नक्कीच केल्या जाईल असे सांगितले सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता माझ्याकडे अजून कारवाईचे कागदपत्रे आले नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव व ट्रॅक्टर क्रमांक माहीत नाही अशी माहिती तहसीलदारांनी दिली.
तालुक्यातील वैनगंगा पट्ट्यामध्ये सध्या वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात उपसा करून कहर केला आहे. प्रशासनाकडून अधून मधून होणाऱ्या कारवाईने माफियांना वचक बसवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी होणाऱ्या कारवाईचा वाळू माफियांना फरक पडत नसल्याचे दिसत आहे. बुधवार एक मे रोजी सकाळच्या सुमारास महसूल विभागाच्या नायब तहसीलदार यांनी तालुक्यातील आष्टी परिसरात पथका सोबत आले असताना मुख्य रस्त्यावर एक ट्रॅक्टर अवैध वाळू सह त्यांच्या निदर्शनास आला.
यावेळी सदरील ट्रॅक्टर जप्त करत पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशन आष्टी येथे आणून लावण्यात आला आहे . पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्याचा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे यावेळी महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .
दरम्यान इल्लूर , ठाकरी,कुनघाडा, कढोली, इत्यादी ठिकाणी वैनगंगा नदी पात्रामधून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू असुन प्रशासनाने कारवाई करत अवैध उत्खनन थांबवावे अशी मागणी होत आहे
विना नंबर चा ट्रॅक्टर कुनाच्या मालकीचा आहे हा कुतुहलाचा विषय आहे त्या मालकावर खरच कारवाई करण्यात येणार काय असा प्रश्न उपस्थित होतो ऊ
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments