ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
28-03-2025
प्रसुती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू
गडचिरोली : रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याचा फटका रुग्णांना बसत असतो. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ मार्च रोजी असाच प्रकार घडला. प्रसूतीदरम्यान एका नवजात बाळाचा मृत्यू झाला.
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थायी एकही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. डॉ. डोंगरवार यांची नियुक्ती कुरखेडा रुग्णालयात आहे. पण, त्यांना प्रतीनियुवर गडचिरोली येथील रुग्णालयात नेमण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात एकूण ७ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यापैकी ३ वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर बाहेर आहेत. अनेकदा सर्जन बाहेरून बोलविला जातो; पण ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. बाळाच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे पालक दिव्याणी व प्रफुल्ल चवरे यांनी सांगितले.
वैद्यकीय अधीक्षक काय म्हणतात...
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ठमके यांनी, बाळाचा मृत्यू गर्भातच झाला होता. सदर महिला लवकर भरती झाली असती तर तिला रेफर करण्यासाठी वेळ मिळाला असता, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
रुग्णालयात परिपूर्ण नाश्ता मिळतो काय?
नातेवाइकासाठी जेवणाची सोय असणे आवश्यक आहे. परंतु, कुरखेडा रुग्णालयात उपचारार्थ भरती होणाऱ्या रुग्णांच्या एकाही नातेवाइकास जेवण मिळत नाही.
नाश्त्यात दूध, अंडी, केळी मिळणे गरजचे आहे. परंतु, केवळ केळी वितरित केली जाते, असा आरोप नातेवाइकांचा आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची हेळसांड होत असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला. नेहमीच डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे गरीब रुग्णांचा जीव जातो, असे म्हटले जाते आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments