बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
03-08-2024
ठाकरी ग्रामस्थांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत जायचे तरी कसे?
ग्रामपंचायत ठाकरीने केले ग्रामस्थांचे बेहाल
सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी एकदा तरी भेट दिली काय आरोग्य उपकेंद्रत
आष्टी ता. ३ : चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील आरोग्य उपकेंद्र येथे रुग्णांना जाण्यासाठी मार्ग खडतर व चिखलमय झालेला असून या बाबी करीता ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे
ठाकरी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील पेनय्या वर्धलवार यांच्या घरापासून ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत तांडा वस्ती योजनेअंतर्गत रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली खोदकाम करून सुरुवात केली. हे काम एक महिन्यापासून रेंगाळत असल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दोन्ही बाजूने रस्ताच बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच याची गंभीर दखल ग्रामपंचायत प्रशासनाने न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ठाकरी येथील ग्रामस्थांसाठी रहदारिच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे शाळेत, अंगणवाडीतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व येथील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाकरी ग्रामपंचायत प्रशासनाने सदर रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला. पावसाळ्यात हे काम पूर्ण होणार नाही हे माहीत असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने एवढी घाई करुन कामाला का सुरुवात केली? असा प्रश्न ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. रस्त्याच्या बाजूने नाली खोदकाम करून रस्त्यावर केवळ दोन तीन ब्रास खडी आणि दोन तीन ब्रास वाळू टाकून ठेवण्यात आली आहे. नाली खोदकाम करून ठेवले असल्याने नालीची माती रोडवर पसरल्याने मोठ्या प्रमाणात या रोडवर चिखल पसरलेला आहे या चिखलातून वाट काढण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे. गेल्या १ महिन्यापासून रस्त्याचे काम ठप्प आहे.पावसाळ्याला सुरुवात होत असताना रस्त्याचे काम सुरू केले आहे आणि पावसाळा सुरू असल्याने काम अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. सदर काम ठप्प का झाले असे ग्रामसेवकास ग्रामस्थांनी विचारले असता ग्रामसेवक पावसाळा आहे या रस्ता बांधकाकरीता निधी नाही तुमच्या हिशोबाने काम होईल का असे उत्तर ग्रामसेवक देत असल्याचे ग्रामस्थ सांगतात या कामाकरीता निधी नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने कामाला सुरुवात कशी काय सुरुवात केली घरचे पैसे लावुन काम करणार होते का? नाहीतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून आम्हाला जाणूनबुजून त्रास देण्याकरिता कामाला सुरुवात करुन काम ठप्प केले? आम्ही काम आणले आणि कामाला सुरुवात केलेत पण पावसाळा सुरू असल्याने काम थांबले आहे हे दाखवण्यासाठी का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत सरपंच, उपसरपंच राहत गावात स्थानिक राहत नसल्याने त्यांना या अडचणी काय समजणार आहेत काय?
सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी एकदा या रस्त्याने आवागमन करून पहा तुम्हालाही समजेल चिखलातून वाट काढण्याकरिता काय त्रास होतो अशी येथील ग्रामस्थांची ओरड सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत रुग्ण जाणार तरी कसे असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments