संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
29-01-2024
घोट पोलीस स्टेशनच्या वतीने तीन आदिवासी आश्रमशाळेत विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सम्पन्न
अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक
आष्टी:-
जिल्हा पोलीस प्रशासना अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता ,अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ गडचिरोली यांचे मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाडबडी, स्वर्गवासी वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळा रेखेगाव, स्वर्गवासी सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव येथे प्रयास उपक्रमा अंतर्गत वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धा परीक्षेला मौजा भाडबडी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीचे 218 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच स्वर्गवासी वसंतराव नाईक व स्वर्गवासी सूरजमल चव्हाण प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव येथील 117 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रयास उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञानावर आधारित दररोज दहा प्रश्न दिले जातात व त्याच प्रश्नांवर आधारित तिमाही स्पर्धा परीक्षा घेतली जात असते. व आज रोजी आयोजित वीर बाबुराव शेडमाके सामान्यज्ञान स्पर्धेकरिता पोलीस मदत केंद्र घोट हद्दीतील 02 आश्रम शाळेतील एकूण 335 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन परीक्षेला चांगला प्रतिसाद दिला.
सदर परीक्षा ही पोलीस मदत केंद्र घोट चे प्रभारी अधिकारी सपोनि नितेश गोहने व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाडभीडीचे मुख्याध्यापक मैंद तसेच शाळेतील शिक्षक वृंद, व पोलीस स्टाफ यांचे उपस्थितीत शांततेत पार पडली.
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले की, प्रयास उपक्रम हा खूप सुंदर उपक्रम असून विद्यार्थ्यांची ज्ञान क्षमता वाढवण्याचे हे एक उत्तम साधन असून यानंतर सुद्धा असेच उपक्रम राबवावे व परीक्षेचे आयोजन करावे असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे व पोलीस मदत केंद्र घोट चे आभार मानले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments