संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
29-01-2025
ईल्लूर गावा जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक, तिघेही जखमी
आष्टी (प्रतिनिधि) ## दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसली यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास ईल्लुर गावा जवळील वळणावर घडली . जखमी युवकाचे नाव संदिप टेकूलवार , वय २७ , संतोष गोर्लावार , वय ३४ रा. दोघेही कुनघाडा (माल) व स्वप्निल मोहूर्ले, वय २८ , रा . दरुर असे आहे.
कुनघाडा येथून दुचाकीवर संदीप टेकुलवार , व संतोष गोर्लावार हे दोघे आष्टीकडे येत असताना व आष्टी कडून स्वप्नील मोहुर्ले हा इलुर कडे जात असताना इल्लूर येथील वळणावर दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीवरील तिघेही जण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील संदिप टेकुलवार व संतोष गोर्लावार यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments