संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
17-08-2024
शेतातील कामे आटोपून शेतातीलच विहिरीत हातपाय धुवायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
एटापल्लीः
आईवडिलांसोबत शेतातील कामासाठी मुलगा सोबत गेला कामे आटोपून हातपाय धुण्यासाठी शेतशिवारात असलेल्या विहिरीवर हात पाय धुऊन घेण्यासाठी गेला व पाय घसरून पडल्याने विहीरीत बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी डुम्मे गावात घडली.
निखिल सदाशिव दुर्वा (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावा वर्ग उत्तीर्ण झालेला होता डुम्मे गावात आईवडील व भावासमवेत तो राहायचा. १५ ऑगस्टला स्वतःच्या शेतात धान
रोवणीचे काम सुरू होते. त्यासाठी तो गेला होता. दुपारी २ वाजता जेवणाची वेळ झाली. हातपाय धुण्यासाठी निखिल हा विहिरीवर गेला, यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही निखिल न आल्याने आई विहिरीजवळ गेली असता तिला त्याची चप्पल दिसली.
तेव्हा मुलगा विहीरीत पडला असल्याचे चित्र दिसून आले लागलीच पोलीस स्टेशन ला माहिती दिली आहे
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments