ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
10-07-2024
सर्पदंशाने युवकाचा मृत्यू , नदीवर पूल असता तर वाचला असता जीव
- पर्यायी मार्गाचा गंभीर रुग्णांनाही फटका
ता. प्र / कुरखेडा दि. ०९ : तालुक्यातील सावरगांव (येगंलखेडा) येथे शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. करण संजय उईके (वय २२) रा.बोरटोला भरनोलि ता. अर्जुनी मोर जि.गोंदिया असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण हा कुरखेडा तालुक्यातील सावरगाव (येंगलखेडा) येथे शेती कामानिमित्त आला होता. दरम्यान सोमवार ८ जुलै रोजी शेतात काम करतांना त्याला सर्पदंश झाला. लागलीच त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याला मृत्युने कवटाळले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करत काही क्षणांपूर्वी पोहचले असते तर रुग्ण दगावला नसता असे सांगितले. युवा शेतकऱ्याचा अशा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नदीवर पूल असता तर वाचला असता जीव
करन ल सर्पदंश झाल्याने रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र पुलाभावी ते पोहचण्यास अधिक विलंब लागणार असे सांगतात आल्याचे कळते. त्यामुळे सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता खासगी वाहनाने कुरखेडा येथे हलविले मात्र पर्यायी मार्गाचा अधिकचा अंतर आणि लागणारा वेळ यामुळे रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाला आणि करन चां मृत्यू झाला, नदीवर पूल असता तर जीव वाचला असता असे बोलण्यात येत आहे.
कुरखेडा येथील सती नदीवरील जुना पूल पडून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान शेजारीच नदीतून रपटा तयार करण्यात आला होता मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने ४ जुलै रोजी वाहून गेला. त्यामुळे आता कुरखेडा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी आंधळी - वाघेडा - मालदुगी - गोठणगाव फाटा असा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र हे अंतर आता अधिक असल्याने या मार्गाने तालुका गाठण्यासाठी अधिकचा वेळ लागत असल्याने याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही अशी ओरड नागरिकांची आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments