समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
27-07-2024
चक्क खाटेची कावड करून मुलाची चिखलातून 18 कि.मी. पायपीट
भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील वास्तव
भामरागड : - चक्क खाटेची कावड करून आपल्या वडीलास १८ की.मी. पायदळ जाऊन भामरागडच्या रुग्णालयात उपचार केले व पुन्हा त्याच पद्धतीने घरी सुद्धा पोहचविले हे आहे भामरागड तालुक्यातील वास्तव मात्र लोकप्रतिनिधीचे या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे
शेतशिवारात शेतीचे काम करीत असताना घसरून पडल्याने जखमी झालेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी कसल्याही प्रकारची सोय व वाहन उपलब्ध होत नसल्याने मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल 18 कि.मी. पायपीट केली. वाटेत नदी तुडूंब भरलेली होती, पण पितृ प्रेमही ओसंडून वाहत होते, त्यामुळे नावेतून नदी पार केल्यानंतर रुग्णालयात दाखल केले.
मालू केये मज्जी वय, 67 वर्ष, रा. भटपार ता. भामरागड जिल्हा, गडचिरोली असे जखमी पित्याचे नाव आहे.
जिल्ह्यात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागाला बसला. पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे
पुसु मालू मज्जी व त्याचे मीत्र कावड घेऊन जातिअसतांना पामुलगौतम नदी तुडूंब भरुन वाहत होती, पण पुसू मालू मज्जी व त्याच्या मित्रांनी हिंमत न हारता नावेत खाट टाकून नदी पार केली. तेथून पुन्हा खाटेवरुनच त्यांनी मालू मज्जी यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली, त्यानंतर एक्सरे काढला. यात त्यांचा पाय फ्रैक्चर असल्याचे निदान झाले. या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच, पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत, हे देखील वास्तव यामुळे चव्हाट्यावर आले आहे या परिसरात विकासाचे आव आणणारे लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेऊन आहेत काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे दुर्गम भागातील आदिवासींचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत
मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. गडचिरोलीचा संपर्क तुटलेला असल्याने मुलगा पुसू मालू मज्जी हा निराश झाला. तात्पुरत्या उपचारानंतर वडिलांना घेऊन तो पुन्हा खाटेची कावड करुनच भटपार येथे घरी परतला.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments